कात्नेशवर मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:16+5:302021-06-06T04:14:16+5:30
परभणी : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पाऊस होत असून शुक्रवारी कात्नेश्वर मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. राज्यात अद्याप ...

कात्नेशवर मंडळात अतिवृष्टी
परभणी : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पाऊस होत असून शुक्रवारी कात्नेश्वर मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे.
राज्यात अद्याप मान्सून दाखल झाला नसला तरी जिल्ह्यात पूर्व मोसमी पाऊस बरसत आहे. तीन दिवसांपासून सलग पाऊस होत असल्याने मशागतीच्या कामांमध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून पेरणीच्या तयारीला वेग आला आहे.
शुक्रवारी दिवसभर आणि रात्री सर्वदूर पाऊस झाला. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १६.१ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर मंडळात सर्वाधिक ७५.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, या मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. शनिवारीदेखील दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. ढगाळ वातावरणामुळे अधूनमधून पावसाची रिपरीप सुरू होती. सकाळी ६ वाजेपासून ते १० वाजेपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील रस्ते चिखलमय झाले आहेत. पावसाळ्यापूर्वीच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत परभणी तालुक्यात ६.५, गंगाखेड १६.१, पाथरी २९, जिंतूर २.७, पूर्णा ३८.३, पालम २१.१, सेलू ९.५, सोनपेठ २२.६ आणि मानवत तालुक्यात १४.२ मिमी पाऊस झाला आहे.