आरोग्य विभागाला आली जाग
By Admin | Updated: September 16, 2014 01:34 IST2014-09-16T00:59:25+5:302014-09-16T01:34:06+5:30
वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथील बालिकेला डेंग्युचा आजार निष्पन्न झाल्याचे वृत्त १५ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला

आरोग्य विभागाला आली जाग
वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथील बालिकेला डेंग्युचा आजार निष्पन्न झाल्याचे वृत्त १५ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला व गावामध्ये जावून सर्व्हे करण्यात आला.
वालूर येथील ग्रामस्थ गेल्या आठ दिवसांपासून तापीच्या आजाराने त्रस्त झाले होते. एका बालिकेवर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात डेंग्युसारख्या आजारावर उपचार करण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १५ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाले. त्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. सोमवारी सकाळी आरोग्य विभागाच्या पथकाने वालूर येथे येऊन तब्बल ३५० रुग्णांची तपासणी केली. तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने घरोघरी जाऊन साठवून ठेवलेले पाणी सांडून दिले. तसेच तुंबलेल्या नाल्यातील कचरा काढून पाणी वाहते करून धूर फवारणी केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तीन आरोग्य पथकांची स्थापना करण्यात आली. याद्वारे गावातील तापीच्या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. या मोहिमेमध्ये जिल्हा आरोग्य विभागातील अधिकारी पुणेकर, कृष्णा साळवे, नवले आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. (वार्ताहर)
वालूर गावामध्ये डेंग्युचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने सोमवारी साडे तीनशे रुग्णांची तपासणी करून तीनशे रुग्णांचे रक्ताचे नमूने संकलीत केले.
४आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये सहा रुग्णांना ताप असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
४डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून गावात स्वच्छता राखावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.