घरात ठेवलेले २ लाख ९० हजार रुपये चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:36+5:302021-09-02T04:38:36+5:30
शहरातील साई कॉर्नर भागातील पदमा राजया गुंडेवार यांना प्लाॅट घ्यायचा असल्याने त्यांनी मार्च २०२१ मध्ये बॅंकेतून २ लाख ७० ...

घरात ठेवलेले २ लाख ९० हजार रुपये चोरले
शहरातील साई कॉर्नर भागातील पदमा राजया गुंडेवार यांना प्लाॅट घ्यायचा असल्याने त्यांनी मार्च २०२१ मध्ये बॅंकेतून २ लाख ७० हजार रुपये काढून स्वत: जवळच्या २० हजार रुपयांसह एकूण २ लाख ९० रुपये एका पिशवीत कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते. त्यामुळे पदमा गुंडेवार यांचा मुलगा कमलेश हा घराला कोंडा व गेटला कुलूप लावून बाहेर गेला होता. सायंकाळी ५.३० च्या सुमारास तो परत आला असता घराचा दरवाजा उघडा दिसला. तसेच घराच्या आतील कपाटाचा दरवाजाही उघडा दिसला. ही माहिती त्याने त्याची आई पदमा गुंडेवार यांना दिली. यावेळी त्यांनी घरी येऊन पाहिले असता कपाटात ठेवलेले रोख २ लाख ९० हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले. तसेच बाजूच्या दुसऱ्या लॉकर मधील दागिने व ७ हजार रुपये मात्र जागीच होते. याबाबत पदमा गुंडेवार यांनी मंगळवारी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.