फिरण्यास आलेल्या तरुणावर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST2021-07-07T04:22:21+5:302021-07-07T04:22:21+5:30
शहरातील खानापूर फाटा भागातील प्रीतम सुरेश गायकवाड हा १९ वर्षीय तरुण सोमवारी सकाळी ५.४५ च्या सुमारास खानापूर फाटा भागातील ...

फिरण्यास आलेल्या तरुणावर चाकूने वार
शहरातील खानापूर फाटा भागातील प्रीतम सुरेश गायकवाड हा १९ वर्षीय तरुण सोमवारी सकाळी ५.४५ च्या सुमारास खानापूर फाटा भागातील आनंदनगरच्या शाळा परिसरात फिरण्यास गेला असता तेथे त्याच्या ओळखीचा रोहित दयानंद ढबाले हा भेटला. त्याने प्रीतम याला इकडे कशाला आला, म्हणून शिवीगाळ सुरू केली. या वेळी प्रीतम याने शिवीगाळ करू नको, असे म्हणताच रोहित ढबाले याने त्याच्या जवळील कमरेला असलेला चाकू काढून प्रीतम याच्यावर वार केले. यात प्रीतम गंभीर जखमी झाला. या वेळी आरडाओरडा ऐकून इतर दोघांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्यांचे भांडण सोडविले. त्यानंतर प्रीतम याला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत प्रीतम सुरेश गायकवाड याने मंगळवारी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी रोहित दयानंद ढबाले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.