आई वडिलांचे कष्ट हीच पाल्यांसाठी प्रेरणा : श्रवण दत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST2021-02-08T04:15:16+5:302021-02-08T04:15:16+5:30
येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयीन युवक, युवतींना मार्गदर्शन करताना दत्त बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुरेश सदावर्ते हे होते. ...

आई वडिलांचे कष्ट हीच पाल्यांसाठी प्रेरणा : श्रवण दत्त
येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयीन युवक, युवतींना मार्गदर्शन करताना दत्त बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुरेश सदावर्ते हे होते. श्रवण दत्त यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. श्रवण दत्त म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी न समजता मेहनत केल्यास काहीच अशक्य नाही. यशस्वी विद्यार्थी स्वतःसोबतच देशाची प्रगती घडवून आणू शकतो. यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना दत्त यांनी स्वअनुभव कथन केला. आंध्रप्रदेशातील वरंगल येथून सुरू झालेले आपले शैक्षणिक जीवन आयपीएस अधिकारी होण्यापर्यंत कसे पोहोचले, याबाबतचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. पोलीस निरीक्षक पाटील यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मोबाइलचा योग्य वापर करून अभिलाषेच्या संदेशाला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये तसेच विनापरवाना व बेशिस्त वाहने चालवू नयेत. डॉ.सदावर्ते यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रा.पांडुरंग निळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.रमेश गुडदे यांनी आभार मानले. प्रा.डॉ.श्रीधर भोंबे, प्रा.सी.डी. भड यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.