शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांचे कंबरडे मोडले; एकाच कारवाईत तब्बल ९८ आरोपी, नऊ कोटींचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 11:48 IST

sand mafia: पूर्णा तालुक्यातील वझुर येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली

परभणी :  पूर्णा तालुक्यातील वझुर येथील वाळू धक्क्यावरून अवैध वाळू उपसा केला जात असताना १२ मे रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, तब्बल ९८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी ४५ वाहने जप्त केली आहेत. एकूण ७ कोटी ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. वाळू घाटांचे लिलाव झाले असले तरी नियमांचे उल्लंघन करीत हा वाळू उपसा होत असल्याने पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले आहे. १२ मे रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील वझुर येथे जेसीबी, बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रेनिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक माने, पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत ९८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वाळू उपसा करण्यासाठी वापरलेली ४५ वाहने जप्त केली आहेत. एकूण ७ कोटी ३९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वझुर परिसरात केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

तक्रारीत पोलिसांनी काय म्हटले?- पूर्णा तालुक्यातील वझुर येथील वाळू घाटात रात्रीच्यावेळी वाळूचे उत्खनन करण्यासाठी कोणताही परवाना नसताना जाणीवपूर्वक नदीपात्रात उतरून वाळू उत्खनन केले. - नदीपात्रात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पाण्यामध्ये दगड-गोटे मुरूम वेड्या बाभळी टाकून पात्रात बंधारा बांधला. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाला.- मुरूम व वेड्या बाभळीच्या काट्या व लाकडाने नदी पात्रातील पाणी दूषित करण्यात आले. पिण्यायोग्य असलेले पाणी दूषित करणे, त्याचप्रमाणे पाण्याच्या प्रवाहात बदल करून प्रमाणाबाहेर वाळूचे उत्खनन करण्यात आले. या उत्खननाने शेती व पिण्याच्या पाण्यामध्ये घट होईल याची जाणीव असतानाही अशी कृती करणे.- नदीच्या निचरा प्रक्रियेस क्षती पोहचविणे, या कारणांवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :sandवाळूparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी