वसमत रोड, बसस्थानकासह १० ठिकाणी दुचाकी सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:21 IST2021-09-22T04:21:12+5:302021-09-22T04:21:12+5:30
आकडे काय सांगतात? वर्षभरात शहरातील दुचाकी चोरी १३० कोतवाली पोलीस स्टेशन २९ नानलपेठ पोलीस स्टेशन ४६ आतापर्यंत सापडल्या ३० ...

वसमत रोड, बसस्थानकासह १० ठिकाणी दुचाकी सांभाळा
आकडे काय सांगतात?
वर्षभरात शहरातील दुचाकी चोरी १३०
कोतवाली पोलीस स्टेशन २९
नानलपेठ पोलीस स्टेशन ४६
आतापर्यंत सापडल्या ३० दुचाकी
शहरात मागील वर्षी नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या भागातून ४६ दुचाकी चोरीच्या घटना घडल्या. यातील १० दुचाकी सापडल्या. तर कोतवाली हद्दीतून २९ दुचाकी चोरीला गेल्या यातील ६ सापडल्या. यासह उर्वरित काही ठिकाणच्या १४ दुचाकी सापडल्या आहेत. नवा मोंढ्याची आकडेवारी तेथील संबंधित कर्मचारी यांनी दिली नाही.
सेलूतील ५२ दुचाकी चोरीला
सेलू शहरात दुचाकी चोरीचे सत्र मागील चार ते सहा महिन्यांपासून सुरू आहे. यात तब्बल ५२ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. यात एकाच कंपनीच्या दुचाकी चोरीला जात असल्याचे येथील घटनेवरून दिसून येते.