ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST2021-09-02T04:39:12+5:302021-09-02T04:39:12+5:30
कोरोना झाल्यानंतर अनेकांना वेगवेगळे आजार जाणवू लागले आहेत. यामध्ये केस गळतीचे प्रमाणही वाढले आहे. रक्त कमी झाल्याने तसेच चाई ...

ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस
कोरोना झाल्यानंतर अनेकांना वेगवेगळे आजार जाणवू लागले आहेत. यामध्ये केस गळतीचे प्रमाणही वाढले आहे. रक्त कमी झाल्याने तसेच चाई लागल्याने केस गळती होत आहे. यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार करणे गरजेचे आहे. तसेच घरगुती उपाय करताना वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
डाँक्टरांचा कोट
कोरोना होऊन गेल्यानंतरच्या काळात केस गळतीची समस्या अनेकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना झाल्यानंतर ताण वाढल्याने हा परिणाम जाणवत आहे. केसगळती सोबतच भूक न लागणे, जीभेची चव जाणे असे प्रकारही दिसून आले आहेत. यासाठी प्रत्येकान प्रथिनेयुक्त तसेच विटामिनयुक्त आहार घ्यावा. - डॉ. मोरे, त्वचारोग तज्ञ.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच करा घरगुती उपाय
हिरव्या भाज्या, सफरचंद, सीताफळ अशी फळे प्रत्येकाने कोरोना होऊन गेल्यानंतर खावीत. दुधाचे पदार्थ, कडधान्य, अंडी यांचे सेवन दररोज करावे. रक्त कमी झाले असल्यास पेंडखजूर, गुळ, शेंगदाणा लाडू खावेत. यामुळे केस गळती थांबण्यासाठी मदत होऊ शकते.
कोविडनंतर तीन महिन्यांनी गळू लागतात केस
कुठलाही आजार झाल्यानंतर केस गळतीचे प्रमाण वाढू लागले आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला, त्यांना दोन ते तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर केस गळतीची समस्या जाणवत आहे. अशा रुग्णांची संख्या सध्या वाढल्याचे त्वचारोग तज्ञांनी सांगितले.
हे करा
शरीरातील रक्ताची नियमित तपासणी करावी. रक्त कमी झाले असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रक्तवाढीच्या गोळ्या घ्याव्यात. केस गळतीचे टक्कल पडणे व चाई लागणे असे दोन प्रकार आहेत. या दोन्ही प्रकारांकडे कोणीही दुर्लक्ष करू नये.