मासूम कॉलनीत जप्त केला पावणेदोन लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:33+5:302021-05-17T04:15:33+5:30
परभणी : शहरातील मासूम कॉलनी भागात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी (दि.१६) कारवाई करून १ लाख ७२ हजार ...

मासूम कॉलनीत जप्त केला पावणेदोन लाखांचा गुटखा
परभणी : शहरातील मासूम कॉलनी भागात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी (दि.१६) कारवाई करून १ लाख ७२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.
शहरातील मासूम कॉलनी भागात एका घरामध्ये अवैधरीत्या गुटखा साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, कर्मचारी दीपक मुंडे, जाकीर सय्यद, बंकट लटपटे, भगवान हुंडेकर, अनिल इंगळे, कपिल घोडके, आदींनी रविवारी छापा टाकला. यावेळी १ लाख ७२ हजार ४०० रुपयांचा गुटखा, सात हजार रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले. या कारवाईत एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.