जिल्हा सीमेवरील नाक्यावर सव्वा लाखाचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:18 IST2021-05-11T04:18:16+5:302021-05-11T04:18:16+5:30
परभणी जिल्ह्याच्या सीमेवर देवगाव फाटा येथे तपासणी नाका स्थापन करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास एमएच २० एजी ...

जिल्हा सीमेवरील नाक्यावर सव्वा लाखाचा गुटखा पकडला
परभणी जिल्ह्याच्या सीमेवर देवगाव फाटा येथे तपासणी नाका स्थापन करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास एमएच २० एजी ३१६१ क्रमांकाची कार मंठा येथून जिंतूरकडे जात होती. यावेळी तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी ही कार थांबवून कारची तपासणी केली असता कारच्या डिकीत बंदी असलेला एक लाख १३ हजार ९६० रुपयांचा गुटखा आढळून आला. यावेळी घेण्यात आलेल्या झडतीत चार हजार ५०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. पथकाने कार, गुटखा व रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी पोलीस नाईक शिवदास सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख जुनेद शेख आयुब, शेख अकील शेख अजमत या दोघांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जमादार गुलाब भिसे, पो. ना. अमृत शिराळे, पोलीस ना. शिवदास सूर्यवंशी, रासकटला, शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांच्या पथकाने केली.