जिल्ह्यात वाढली गुटख्याची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST2021-02-07T04:16:12+5:302021-02-07T04:16:12+5:30
शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था परभणी : शहरातील काही सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे . त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे ...

जिल्ह्यात वाढली गुटख्याची विक्री
शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था
परभणी : शहरातील काही सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे . त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे . लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या स्वच्छतागृहांची केवळ देखभाल दुरुस्ती नसल्याने ही अवस्था झाली आहे . महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. तेव्हा सर्व स्वच्छतागृह वापरात आणावेत,अशी नागरिकांची मागणी आहे.
उखडलेल्या रस्त्यामुळे अपघातांना निमंत्रण
परभणी : येथील वसमत रस्त्यावरील असोला पाटी ते झिरोफाटा हा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना एकेरी मार्गावरुन वाहतूक करावी लागते. आधीच खड्डेमय रस्ता त्यात एकेरी वाहतूक होत असल्याने वाहनधारकांना हा रस्ता पार करताना कसरत करावी लागते. महामार्ग प्रशासनाने या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
असुविधा वाढल्याने प्रवाशांची गैरसोय
परभणी : येथील बसस्थानकावर असुविधा निर्माण झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पुरेशी आसन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आदी असुविधांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. महामंडळ प्रशासनाने याठिकाणी प्रवाशांना पुरेशा सुविधा उपलब्ध करुन दिल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे .
पाणी आवर्तनाची नागरिकांना प्रतीक्षा
परभणी : जायकवाडी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी तिसरे पाणी आवर्तन द्यावे, अशी मागणी लाभार्थी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या गहू आणि हरभरा ही दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. दुसऱ्या पाण्याच्या आवर्तनानंतर मोठा खंड पडला असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे . पिकांना पाण्याचा ताण पडू नये, यासाठी पाटबंधारे विभागाने तिसऱ्या पाण्याचे आवर्तन मंजूर करावे, अशी लाभार्थी शेतकऱ्यांची मागणी आहे.
बाजारपेठ भागात वाहनतळाचा अभाव
परभणी : शहरातील बाजारपेठ भागात वाहनतळासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वाहतुकीच्या समस्या वाढत आहेत. बाजारपेठेत येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही. मनपाने वाहनतळासाठी निश्चित केलेल्या जागेवर अतिक्रमण वाढले आहे. तेव्हा मनपा प्रशासनाने वाहनतळावरील अतिक्रमण हटवून वाहनतळाच्या जागा खुल्या करुन द्याव्यात, अशी मागणी होत आहे.