जिल्ह्यात गुटख्याची विक्री सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:05+5:302021-02-05T06:07:05+5:30
बाह्यवळण रस्त्याचे काम ठप्प परभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम ठप्प पडले आहे. ...

जिल्ह्यात गुटख्याची विक्री सुरूच
बाह्यवळण रस्त्याचे काम ठप्प
परभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम ठप्प पडले आहे. या रस्त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांना मावेजा वितरित करण्याची प्रक्रिया अतिशय संथगतीने होत आहे. त्यामुळे रस्त्यासाठी ालागणारी जमीन अद्यापही प्रशासनाच्या ताब्यात आली नसल्याने पुढील कामे ठप्प झाली आहेत.
बाजारपेठेत नियमांचा बोजवारा
परभणी : येथील बाजारपेठ भागात नागरिकांची गर्दी होत असून, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अनेक नागरिक विनामास्क फिरत आहेत. त्याचप्रमाणे, फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचेही पालन केले जात नाही. नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयीची भीती कमी झाल्याने हा प्रकार आता वाढला आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी अजूनही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
एकेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी
परभणी : शहरातील अनेक भागात अरुंद रस्ते असून, या रस्त्यांवर दोन्ही बाजूने वाहतूक केली जाते. त्यामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरात एकेरी वाहतुकीचे काटेकोर पालन झाल्यस ही समस्या दूर होऊ शकते. मात्र, नियम डावलूृन अनेक वाहनधारक विरुद्ध बाजूने वाहने चालवितात. परिणामी, वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.
रेल्वे स्थानकावरील दादऱ्याचे काम संथगतीने
परभणी : येथील रेल्वे स्थानकावर अधिक रुंदीचा दादरा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम संथगतीने होत असल्याने ते कधी पूर्ण होईल, याची प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या रेल्वे वाहतूक मर्यादित स्वरूपाची आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्याही कमी आहे. त्यामुळे काम गतीने पूर्ण करण्याची संधी असून, रेल्वेसेवा सुरळीत होण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.
शहरातील पार्किंगचा बोजवारा
परभणी : शहरात बाजारपेठ भागात वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेने वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मध्यंतरी महापालिकेने पार्किंगची जागा निश्चित केली होती. मात्र, त्या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत.