पाथरीत ६१ हजार रुपयांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST2021-04-12T04:15:52+5:302021-04-12T04:15:52+5:30
पाथरी शहरातील बांदरवाडा रस्त्यावरून एका दुचाकीवरून अवैधरीत्या गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी ११ ...

पाथरीत ६१ हजार रुपयांचा गुटखा जप्त
पाथरी शहरातील बांदरवाडा रस्त्यावरून एका दुचाकीवरून अवैधरीत्या गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी ११ एप्रिल रोजी बांदरवाडा रस्त्यावर सापळा रचला. या सापळ्यात दोन आरोपींकडून अवैधरीत्या गुटखा जप्त केला. पोलिसांनी या आरोपींची झाडाझडती घेतल्यानंतर ६१ हजार ५०० रुपयांचा गुटखा, तसेच ६० हजारांची दुचाकी, असा एकूण १ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आरोपी सय्यद समसेर सय्यद जहीर (रा. इंदिरानगर, पाथरी) व सुधाकर मदन कोल्हे (रा. उमरा) यांच्यावर पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत राऊत यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दलालवाड हे करत आहेत.