धारासूर ग्रामपंचायतीवर गुप्तेश्वर विकास पॅनेलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:27+5:302021-02-05T06:07:27+5:30
धारासूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत प्रताप कदम यांनी यापूर्वी दहा वर्षे सरपंचपद भूषवत केलेल्या कामाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास केला. मतदारांनी ...

धारासूर ग्रामपंचायतीवर गुप्तेश्वर विकास पॅनेलचे वर्चस्व
धारासूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत प्रताप कदम यांनी यापूर्वी दहा वर्षे सरपंचपद भूषवत केलेल्या कामाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास केला. मतदारांनी प्रताप कदम यांच्यावर विश्वास दाखविला. गुप्तेश्वर विकास आघाडी पॅनेलचे रेश्मा अतुल जाधव, सीमा राजेभाऊ कदम, शेषराव चिंतामणराव कदम, ॲड. हर्षला प्रताप कदम, गवळण संभाजी ढेंबरे, राजेभाऊ मणिकराव गवळे व नारायण विश्वनाथ शिंदे हे सात उमेदवार विजयी झाले तर विरोधी गटातील धारेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनेलचे संगीता सुभाष चव्हाण, कलावतीबाई खिरू राठोड, मीरा अंगद जाधव, सुमनबाई तुकाराम जाधव हे चार उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत प्रताप कदम यांच्या नेतृत्वाखालील गुप्तेश्वर विकास आघाडी पॅनेलने ११ पैकी ७ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.