नागपूरच्या विद्यार्थ्यांकडून परभणीतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST2021-09-16T04:23:40+5:302021-09-16T04:23:40+5:30
नागपूर येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार येथील शेतकऱ्यांना कृषिविषयक मार्गदर्शन केले. खरीप ...

नागपूरच्या विद्यार्थ्यांकडून परभणीतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नागपूर येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार येथील शेतकऱ्यांना कृषिविषयक मार्गदर्शन केले. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या पिकांची तिवृष्टीमुळे होणारी पडझड थांबवण्यासाठी लागणारे उपाय सांगितले. तसेच या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणुन घेत त्यांना कृषीविषयक सल्ला दिला. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगातून शेती करण्याचे अवाहनही केले. या वेळी विजय वल्लमवाड, गोविंद ढेंबरे,मोहन सोनुने,अजय यम्मलवाड,राजेश आढाव,जयेश बोबडे आदींची उपस्थिती होती. या वेळी गोविंद ढेंबरे या विद्यार्थ्याने शेतकऱ्याच्या बांधांवर जाऊन कापूस, हळद पिकांना लागणाऱ्या सेंद्रिय खतांची शेतकऱ्यांना माहिती देऊन अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीची विमा कंपनीला ७२ तासांच्या आत माहिती कळवण्यासाठी क्रॉप इन्सुरन्स या मोबाईल ॲपवरून प्रात्यक्षिक करून दाखवले. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.