सायकलिंग करून शिवरायांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:32 IST2021-02-21T04:32:30+5:302021-02-21T04:32:30+5:30

शहर व येलदरी येथील सायकलप्रेमी महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता तसेच समाजबांधवांमध्ये सुदृढ व ...

Greetings to Shivaraya by cycling | सायकलिंग करून शिवरायांना अभिवादन

सायकलिंग करून शिवरायांना अभिवादन

शहर व येलदरी येथील सायकलप्रेमी महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता तसेच समाजबांधवांमध्ये सुदृढ व निरोगी आयुष्य राहण्यासाठी सायकलिंगचे महत्त्व पटवून देत असतात. दोन महिलांसह ११ मावळ्यांनी पहाटे ४:३० वाजता भरपावसात शहरातील विविध भागांत तसेच येलदरीपर्यंत सायकलिंग करून शिवरायांना अनोखे अभिवादन केले. रॅलीस बाळासाहेब काजळे, सैनिक बालाजी शिंदे, अभिजित देशमुख, बालाजी शिंदे, विजय पाटील आदींनी झेंडी दाखवली. रॅलीत राजश्री देबाजे, धनश्री मापारी, प्रमोद भालेराव, ज्ञानोबा मापारी, शाम चव्हाण, यासीन खान, सतीश पलमटे, व्यंकटेश भुरे, दुर्गेश नहातकर, संजय दराडे, यज्ञेश मापारी, अजित गोरे, शहेजाद पठाण अशा १३ मावळ्यांनी सायकलिंग करून शिवरायांना अनोखे अभिवादन केले. या रॅलीत सहभागी सायकलपट्टूंनी केसरी वस्त्र परिधान करून प्रत्येक सायकलवर केसरी ध्वज फडकविले होते.

Web Title: Greetings to Shivaraya by cycling