अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:14 IST2020-12-26T04:14:00+5:302020-12-26T04:14:00+5:30
माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात रामप्रभु मुंढे यांच्या हस्ते माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ...

अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन
माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात रामप्रभु मुंढे यांच्या हस्ते माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी नंदकुमार सुपेकर, प्रशांत फड, जगन्नाथ आंधळे, संजय कातकडे, मोहनराव गित्ते, बलभिम घरजाळे, शिवम गिरी, राजु सुपेकर, शैलेश पालटवाड आदींची उपस्थिती होती.
अभिवादन कार्यक्रम
गंगाखेड- भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या कार्यालयात माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, राज्य कार्यकारिणी सदस्य विठ्ठलराव रबदडे, बाबासाहेब जामगे, नंदकुमार सुपेकर, रामराव फड, लक्ष्मिकांत जब्दे, राजेंद्र राजे, तुकाराम आय्या, सत्यप्रकाश अल्लडवार, भाजपा तालुकाध्यक्ष कृष्णा सोळंके, शहराध्यक्ष श्रीनिवास मोटे, रवि जोशी, अड. आदिनाथ मुंडे, विशाल मुंडे, श्रीपाद कोद्रीकर, बाळासाहेब गव्हाणकर, अतुल तुपकर, राम कुलकर्णी, संघमित्र गायकवाड, अतुल गंजेवार, जयदेव जोशी, सदानंद पेकम आदी उपस्थित होते.
अंकुशराव घांडगे यांचा सत्कार
मानवत : पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथे जागतिक शेतकरी दिनाच्या निमित्ताने झुआरी अँग्रो केमिकल्स कंपनीतर्फे पाथरगव्हाण येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तथा प्रगतशील शेतकरी अंकुशराव लांडगे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अधिक उत्पादनासाठी सेंद्रिय व रासायनिक खताचा योग्य वापर कसा करावा. त्याचबरोबर माती प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी नारायण बांगड यांच्यासह तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्ष लागवड योजना गुलदस्त्यातच
गंगाखेड - पर्यावरणाचा नाश,प्रदुषण वाढ,हवामानात झालेले बदल, ॠतुचक्रातील बिघडलेली घडी या समस्या आ वासुन उभ्या आहेत.निसर्गाचे संतुलन योग्य राखण्यासाठी शासकीय, अशासकिय जमीनी, शाळेच्या जागा, शेतीचे बांध ,रस्ते, कालवे,जलसंपदा प्रकल्प रेल्वे लाईन,महामार्ग, मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करून या वृक्षाचे संगोपन करण्यासाठी राज्यशासन विविध योजना राबवत आहे.मात्र वृक्षाचे संगोपन होत नसल्याने या योजना कागदा पुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. अशा योजनाची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी वृक्षप्रेमीमधुन होत आहे.