ग्रामसेविका निलंबित
By Admin | Updated: December 5, 2014 15:17 IST2014-12-05T15:17:54+5:302014-12-05T15:17:54+5:30
तालुक्यातील गोगल गावच्या ग्रामसेविका देवश्री अन्नपूर्वे यांना मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी निलंबित केले आहे.

ग्रामसेविका निलंबित
>मानवत : तालुक्यातील गोगल गावच्या ग्रामसेविका देवश्री अन्नपूर्वे यांना मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी निलंबित केले आहे.
मानवत तालुक्यातील ग्रामपंचायत गोगलगाव अंतर्गत आंबेगाव बिगर येथे दिनकर लक्ष्मण साखरे यांनी १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नाली बांधकाम व ढापाचे काम पूर्ण केले होते. या कामाच्या मोबदल्यात ग्रामसेविका जयश्री नागोराव अन्नपूर्वे यांनी दिनकर साखरे यांना स्टेट बँक ऑफ हैदराबादचा ३0 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. परंतु, दिनकर साखरे हे बँकेत गेले असता त्यांचा धनादेश वटवला नाही. दिनकर साखरे यांना हा धनादेश जून २0१४ मध्ये दिला होता. धनादेशन वटल्याने साखरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार केली. या प्रकाराची दखल घेत ग्रामसेविका अन्नपूर्र्वे यांना या प्रकरणाचा खुलासा मागितला.
खुलासा समाधानकारक नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी ग्रामसेवक जयश्री नागोराव अन्नपूर्वे यांना निलंबित केले व निलंबनाच्या काळात पंचायत समिती जिंतूर या मुख्यालय देण्यात आले आहे. /(वार्ताहर)