वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST2021-06-23T04:13:23+5:302021-06-23T04:13:23+5:30

रामकृष्ण नगर भागातील दमयंती सुनील दुबे या सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गायीला भाकरी देण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. सकाळची ...

The gold chain around the old man's neck lengthened | वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली

वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली

रामकृष्ण नगर भागातील दमयंती सुनील दुबे या सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गायीला भाकरी देण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. या संधीचा फायदा घेत दोन चोरटे मोटारसायकलवर आले. चोरट्यांनी दमयंती दुबे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसका देऊन चोरून नेली. या प्रकारानंतर दमयंती डुबे यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर शेजाऱ्यांनी परिसरात शोध घेतला ; परंतु चोरटे तोपर्यंत पसार झाले होते. या प्रकारानंतर दमयंती डुबे यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. चोरीला गेलेल्या सोन्याच्या चैनीची किंमत ५० हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले ; परंतु त्यातील काही सीसीटीव्ही बंद असल्याने चोरट्यांचा सुगावा लागला नाही.

Web Title: The gold chain around the old man's neck lengthened