गोदावरी पात्रात पोत्यात बांधलेले प्रेत आढळले

By Admin | Updated: July 9, 2014 00:38 IST2014-07-08T23:35:36+5:302014-07-09T00:38:59+5:30

पालम : तालुक्यातील फरकंडा शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात पोत्यात बांधलेले अनोळखी इसमाचे प्रेत ७ जुलै रोजी सापडले आहे़ या प्रेतास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपास सुरू करण्यात आला आहे़

In the Godavari Shot found the body found in the sack | गोदावरी पात्रात पोत्यात बांधलेले प्रेत आढळले

गोदावरी पात्रात पोत्यात बांधलेले प्रेत आढळले

पालम : तालुक्यातील फरकंडा शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात पोत्यात बांधलेले अनोळखी इसमाचे प्रेत ७ जुलै रोजी सापडले आहे़ या प्रेतास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपास सुरू करण्यात आला आहे़
तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात डिग्रस बंधाऱ्याच बॅक वॉटर आहे़ फरकंडा परिसरात पात्रात पाण्यात पोते तरंगत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले़ याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली़ पोलिस पथको ७ जुलै रोजी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ पाण्यातील पोते काठावर काढण्यात आले़ या पोत्याची दुर्गंधी येत होती़ पोते सोडल्यानंतर या पोत्यात पुरुष जातीचे अनोळखी इसमाचे प्रेत असल्याचे निदर्शनास आले आहे़ पाच फुट, पाच इंच उंची, रंग सावळा, अंगावर खिसा असलेली बनीयान, अकाशी रंगाचा पँट या वर्णनाचे हे प्रेत आहे़ प्रेताच्या अंगावरील पँटवर पूर्णा येथील टेलरची पट्टी लावलेली आहे़ घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी जटाळे यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे़ घटनेचा तपास पोलिस करीत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: In the Godavari Shot found the body found in the sack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.