शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘४००० रुपये दर द्या’; पाथरीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार, रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 16:12 IST

स्वाभिमानी संघटना आणि किसान सभेच्या वतीने रास्ता रोको, २ तास वाहतूक ठप्प

पाथरी (परभणी):परभणी जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाला असला तरी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दरावरून असलेला प्रचंड असंतोष आज चव्हाट्यावर आला. ऊसाला प्रतिटन ४००० रुपये अंतिम दर देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीने पाथरी परभणी रस्त्यावर पोखरनी फाट्यावर मोठे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे पाथरी-परभणी रस्त्यावरील वाहतूक जवळपास दोन तास खोळंबली होती.

‘उत्पादनात नफा मिळवा, मग शेतकऱ्याला न्याय द्या!’अखिल भारतीय ऊस उत्पादक शेतकरी समितीच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले असून, शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांची एक लांब यादी प्रशासनासमोर ठेवली आहे. शेतकरी वर्ष २०२५–२६ साठी उसाला पहिली उचल प्रतिटन ₹३००० आणि अंतिम दर ₹४००० जाहीर करण्याची मुख्य मागणी करत आहेत.

इतर मागण्या:- साखर, इथेनॉल आणि उपपदार्थातून मिळणाऱ्या नफ्याच्या प्रमाणात शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.- २०२४–२५ मधील साखर कारखान्यांच्या प्रलंबित बिलांची तात्काळ पूर्तता व्हावी.- तोडणी व वाहतूक दर प्रतिटन ₹२०० पेक्षा जास्त वाढवू नये.- वीज, खत, औषधे यांच्या महागाईचा विचार करून अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम जाहीर करावी.- PFMS द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याची सक्ती करावी.

मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार नाहीशेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्यामुळे पाथरी-परभणी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलक शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. लेखी हमी दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. जीवनावश्यक गरजा आणि महागाईचा विचार करून सरकारने न्याय्य मागण्यांकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी तीव्र मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pathri Farmers Protest Demanding ₹4000/Ton for Sugarcane, Traffic Disrupted

Web Summary : Farmers in Pathri, Parbhani, blocked roads demanding ₹4000/ton for sugarcane. The protest, led by Swabhimani Shetkari Sanghatana and Kisan Sabha, caused significant traffic disruption. Farmers demand fair prices considering production costs, pending bill clearance, and controlled harvesting rates. They insist on direct payment via PFMS.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेparabhaniपरभणी