शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

सेलू बसस्थानकात मुलींनी रोडरोमियोंना चप्पलने चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 18:24 IST

 पाठलाग करत छेडछाड करणाऱ्या दोन रोडरोमियोंना विद्यार्थ्यानीनी चप्पलने चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

सेलु (परभणी):  पाठलाग करत छेडछाड करणाऱ्या दोन रोडरोमियोंना विद्यार्थ्यानीनी चप्पलने चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार आज दुपारी २ वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात घडला.

ग्रामीण भागातील शेकडो मुली शिक्षणासाठी बसने येणेजाणे करतात. आज दुपारी शाळेतून काही मुली बस स्थानकाकडे येत होत्या. या दरम्यान पारिक काॅलनी येथे दोन रोडरोमियोंनी या मुलींचा पाठलाग सुरु केला. तसेच त्यांना नाव सांगा ना, सांगावेच लागेल असा विचारत छेड काढली. या मुली घाबरतच बसस्थानकात आल्या. येथेही त्यांचे छेडणे सुरूच होते. यामुळे संतापलेल्या मुलींनी त्या रोडरोमिओंची चप्पलेने मारत चांगलीच धुलाई केली. बसस्थानकातील काही प्रवासी व मुलीसुद्धा यात शामिल झाल्या. यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. या घटनेचा व्हिडिओ काही शहरात व्हायरल झाला असून अशा घटना वाढल्याने मुली व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.  

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीSchoolशाळाCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ