शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा गोंधळातच आटोपली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 2:33 PM

रेडीरेकनरनुसार शेतकऱ्यांना बँकेतून पीक कर्जाचे वाटप करावे, ही मागणी लावून धरत शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला.

परभणी :  रेडीरेकनरनुसार शेतकऱ्यांना बँकेतूनपीक कर्जाचे वाटप करावे, ही मागणी लावून धरत शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला; परंतु, बँक प्रशासन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्याची तसदी न घेताच ही सभा संपल्याचे जाहीर केल्याने शेतकरी संतप्त झाले होते़

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १४ आॅगस्ट रोजी बँकेच्या शेतकी भवनात १०१ वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते़ या सभेस बँकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट, सुरेश वरपूडकर, आ़ तान्हाजी मुटकुळे, लक्ष्मणराव दुधाटे, करुणाताई कुंडगीर, बालाजी देसाई, विजयसिंह जामकर, हेमंतराव आडळकर, भगवान सानप, गयाबाराव नाईक, द्वारकाबाई कांबळे यांच्यासह बँक प्रशासन व परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेत संचालक सुरेश वरपूडकर यांनी बँकेच्या ठेवी, उचल, कर्ज व बँकेत उपलब्ध होणाऱ्या सुविधा त्याचबरोबर कामकाजासंबंधी माहिती दिली़ त्यानंतर शेतकरी सभासदांच्या वतीने शेतकऱ्यांना अद्यापही आपल्या बँकेतून नवीन पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले नाही़ त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे़, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला

यावर संचालक मंडळाच्या वतीने पीक कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच पीक कर्जाचे वाटप करण्यात येईल, उत्तर देण्यात आले़ यावर शेतकरी सभासदांचे समाधान झाले नाही़ त्यातच काही शेतकरी सभासदांनी नवीन पीक कर्ज वाटप करताना रेडीरेकननुसार वाटप करणार का? असा सवाल संचालक मंडळ व बँक प्रशासनाला केला़ या प्रश्नावर संचालक मंडळ व बँक प्रशासन उत्तर देण्यास पुढे आले नाही़ त्यामुळे शेतकरी सभासदांनी गोंधळ सुरू केला़ त्यानंतर १० ते १५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता.

शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप बँकेचे संचालक लक्ष्मणराव गोळेगावकर यांनी शेतकऱ्यांना शेतकरी सभासदांना समजविण्याचा प्रयत्न केला़ १० ते १५ मिनिटे झालेल्या भाषणानंतर काही शेतकरी सभासदांनी पुन्हा उठून आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या, उपस्थित केलेल्या प्रश्नाला बगल देऊ नका, असा पवित्रा घेतल्याने पुन्हा गोंधळ निर्माण झाला़ त्यानंतर संचालक मंडळाच्या वतीने ही सभा संपल्याचे जाहीर केले़ या सभेत शेतकरी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर संचालक मंडळ देऊ शकले नाही़ त्यामुळे शेतकरी सभासदांमध्ये बँकेच्या कारभाराविषयी संताप होता.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक