पोखर्णी नृसिंह येथील सरपंचपदी गयाबाई मडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST2021-02-10T04:17:44+5:302021-02-10T04:17:44+5:30
८ फेब्रुवारी रोजी निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. सरपंचपद हे इतर मागास वर्ग महिलासाठी राखीव असून सरपंचपदासाठी ...

पोखर्णी नृसिंह येथील सरपंचपदी गयाबाई मडके
८ फेब्रुवारी रोजी निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. सरपंचपद हे इतर मागास वर्ग महिलासाठी राखीव असून सरपंचपदासाठी गयाबाई इंद्रोबा मडके तर उपसरपंचपदासाठी शेषराव रंगराव वाघ यांनी अर्ज दाखल केले. यांच्याविरुद्ध कुठलाही अर्ज दाखल न झाल्याने सरपंच व उपसरपंचपदाची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एन. पंडित यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी मधुकर पांचाळ, पोलीस पाटील श्रीराम तावरे, ग्रामपंचायत कर्मचारी दिगंबर पडविड, सुनील वाघमारे आदींची उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल ज्ञानोबा वाघ, मारोती बापूराव बाभूळकर, प्रल्हाद मारोती भदर्गे, कौशल्याबाई ज्ञानोबा एडके, जयश्री अशोकराव वाघ, सुनीता सोपानराव वाघ. राधाबाई ज्ञानोबा वाघ आदींची उपस्थिती होती.