स्टेशन रोड भागात रस्त्यावर कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:41 IST2021-01-13T04:41:48+5:302021-01-13T04:41:48+5:30

स्टेडियम परिसरात मैदान दुरुस्तीची कामे सुरू परभणी : येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा स्टेडियम परिसरात मैदानाच्या दुरुस्तीचे काम सुरू ...

Garbage on the road in the Station Road area | स्टेशन रोड भागात रस्त्यावर कचरा

स्टेशन रोड भागात रस्त्यावर कचरा

स्टेडियम परिसरात मैदान दुरुस्तीची कामे सुरू

परभणी : येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा स्टेडियम परिसरात मैदानाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मुरुम टाकून मैदान स्वच्छ करण्यात आले असून, सध्या या मैदानाची दुबई सुरू आहे.

विरुद्ध बाजूने वाहतूक सुरू

परभणी : शहरातील बाजारपेठ भागांमध्ये मागील काही दिवसांपासून विरुद्ध बाजूने वाहतूक केली जात आहे. यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

वातावरण बदलाने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

परभणी : जिल्ह्यात आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. दररोज ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने, त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होत आहे. त्याचप्रमाणे, गहू, ज्वारी, हरभरा या पिकांवर रोगांचा प्रादुर्भावही दिसून येत आहे.

Web Title: Garbage on the road in the Station Road area