ऑफलाईन, ऑनलाईनच्या घोळात लसीकरणाचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:57+5:302021-07-24T04:12:57+5:30
जायकवाडी वगळता इतर ठिकाणी टोकन मिळेना मनपाने सर्व केंद्रांवर सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने लस मिळावी, यासाठी ...

ऑफलाईन, ऑनलाईनच्या घोळात लसीकरणाचा खेळखंडोबा
जायकवाडी वगळता इतर ठिकाणी टोकन मिळेना
मनपाने सर्व केंद्रांवर सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने लस मिळावी, यासाठी टोकन पद्धती सुरु केली. परंतु , सध्या जायकवाडी रुग्णालय वगळता इतर सर्व १५ ठिकाणी कर्मचारी सकाळी लसीकरण सुरु होईपर्यंत टोकन वाटप करण्यासाठी जात नसल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले. जायकवाडी येथे सकाळी २ ते ३ नगरसेवक नेहमीच टोकन वाटप होतात की नाही, याचा आढावा घेतात. यामुळे येथील यंत्रणा सुरळीत आहे.
स्पाॅट नोंदणीवर व्हावे लसीकरण
सध्या प्रत्येक केंद्राला उपलब्ध साठ्यानुसार किमान १०० डोस दिले जात आहेत. यात ऑफलाईन ३० तर ऑनलाईन ३० नोंदणी केली जात आहे. उर्वरित डोस स्पाॅट नोंदणीला मिळणे गरजेचे आहे. मात्र, अनेकदा ऑनलाईन नोंदणी असेल तरच लस दिली जाते. याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना होत आहे.
तरुणांना ऑनलाईन नोंदणीची माहिती मोबाईलमुळे होते. मात्र, ज्येष्ठ नागरिकांकडे याची माहिती नसते. किंवा त्याचा वापर करता येत नाही. यात केंद्रावर गेले की ऑनलाईन नोंदणी केली असेल तर लस मिळेल, असे सांगितले जाते. अशावेळी दररोज खेटे मारावे लागत आहेत.
- यशवंत कुलकर्णी.