मामा हॉटेलमध्ये जुगार; सातजणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:18 IST2021-05-11T04:18:14+5:302021-05-11T04:18:14+5:30
लॉकडाऊन काळात जुगार, अवैध दारू विक्री व इतर अवैध धंदे वाढले आहेत. शहरातील पाथरी रस्त्यावरील मामा हॉटेलमध्ये काहीजण जुगार ...

मामा हॉटेलमध्ये जुगार; सातजणांवर कारवाई
लॉकडाऊन काळात जुगार, अवैध दारू विक्री व इतर अवैध धंदे वाढले आहेत. शहरातील पाथरी रस्त्यावरील मामा हॉटेलमध्ये काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने ९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता हॉटेलमध्ये छापा टाकला. त्यावेळी काहीजण गोलाकार बसून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत होते. या कारवाईत दत्तात्रय लिंबाजी पवार, सर्जेराव सुदामराव खरवडे, मुंजाजी भोजाजी सवणे, रावसाहेब मधुकरराव जटाळ, दत्ता प्रसादराव हरकळ, आत्माराम संभाजी गिरी, गणेश महादेव हांडे या सातजणांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोपींकडून रोख ४३ हजार १९० रुपये, १३ हजार रुपयांचे मोबाईल, चार दुचाकी व एक चारचाकी वाहन असा ४ लाख ९१ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.