शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

जुगाऱ्यांचा सेलू पॅटर्न; सेवाभावी संस्थेत जुगाराचा अड्डा, पोलिसांच्या धाडीत २० जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 5:25 PM

सेवाभावी संस्थेच्या आडून जुगार अड्डा चालविण्याचा हा सेलू पॅटर्न आता चांगलाच चर्चेत आला आहे.  

देवगावफाटा (परभणी): सेलू शहरातील शिवाजी पुतळ्याजवळील गोविंद लॉजच्या तळमजल्यात लोकरत्न सेवाभावी संस्थाच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास धाड टाकली. पोलिसांनी २० जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून रोख रक्कम आणि साहित्य असा ३ लाख ४६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींमध्ये राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांपूर्वीचा शहरातील एका साई सेवाभावी संस्थेच्या दोन हॉलमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली होती. 

सेलू शहरात रविवारी रात्री एका विवाह समारंभास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती. विवाह समारंभ आटोपल्यानंतर ते सेलू रेल्वे स्थानक येथे येऊन देवगीरी एक्सप्रेसने रात्री ९:२५ वाजता मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर बंदोबस्तात असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी रेल्वे स्थानक परीसरातील शिवाजी पुतळ्याजवळील गोविंद लॉजच्या तळमजल्यात लोकरत्न सेवाभावी संस्थेच्या कार्यालावर धाड टाकली. येथील हॉलमध्ये २० व्यक्ती ४ गोलाकार टेबलवर तिरट नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले आहे. तर ५० हजार ४५० रोख, १७ मोबाईल, ८ दुचाकी असा एकूण ३ लाख ४६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोउपनी अशोक जटाळ हे पुढील तपास करीत आहेत. 

दरम्यान, ९ मे रोजी सेलू शहरातीलच कृष्णनगर परिसरात साई सेवाभावी संस्थेच्या दोन खोल्यात सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर याच पोलिस पथकाने धाड टाकली होती. यावेळी जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील प्रतिष्टीत ४४ जणांना जुगार खेळताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर रविवारी पुन्हा एका सेवाभावी संस्थेच्या आडून चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. सेवाभावी संस्थेच्या आडून जुगार अड्डा चालविण्याचा हा सेलू पॅटर्न आता चांगलाच चर्चेत आला आहे.  

असे आहेत आरोपींची नावे :शिरीष नारायण पांडे(रा पांडे गल्ली सेलू) विठ्ठल गंगाधर आकात (विदया नगर सेलू) भारत रावसाहेब घाटगे(रा जुना पेडगाव रोड परभणी) सुनिल माणिकराव राजुरकर( विद्या नगर सेलु)गणेश दत्तराव सवने ( रा.गायत्री नगर सेलू ) सुनिल अंकुश टाके (रा गायत्री नगर सेलु)शेख जाफर शेख उस्मान ( रा. अजीजीया नगर परभणी) शिवाजी बाबुराव खेडकर (रा सुरज मोहल्ला सेलू), लक्ष्मण भागवत खंडीग (रा दत्त नगर कारेगाव रोड परभणी),बाबासाहेब मुंजाजी मोळे( रा सुभेदार गल्ली सेलू,),मनसब मो सुलतान (रा. रहूमत नगर परभणी),अशोक गुलाबराव खूपसे( रा. विदया नगर सेलू),मतीन खान चांद खान(रा. रहेमत नगर परभणी) विनोद सोपानरा (आनंद नगर परभणी), इब्राहीम खान अमानउल्ला खान वय (रा. हाडको परभणी)दिगंबर गोविंद शेरे ( रा. शेरे गल्‍ली सेलू), बबन कचरू बाबा शिरसाट( कुपटा ता. सेलू), शेख बडेखाब शेख कासीम(रा.अजिजिया नगर ,परभणी),उत्तम काशिनाथ डंबाळे (रा.सरोदे नगर सेलू )दिनकर विनायकराव सोळंके( कुपटा ता. सेलू) या २० जणांना ताब्यात घेतले असुन मालक भाऊराव विठ्ठलराव सोनवणे रा. सेलू.अशा २१ जणांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.मालक भाऊराव सोनवणे यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी