सोनपेठ तालुक्यातील विकासकामांसाठी दीड कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:06+5:302021-06-02T04:15:06+5:30
पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आ. सुरेश वरपूडकर यांच्या पाठपुराव्यांतून सोनपेठ-गंगाखेड (शेळगाव मार्गे) या रस्त्याची दुरूस्ती व डांबरीकरण तसेच दोन नवीन ...

सोनपेठ तालुक्यातील विकासकामांसाठी दीड कोटींचा निधी
पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आ. सुरेश वरपूडकर यांच्या पाठपुराव्यांतून सोनपेठ-गंगाखेड (शेळगाव मार्गे) या रस्त्याची दुरूस्ती व डांबरीकरण तसेच दोन नवीन पूल, पुरामुळे नादुरुस्त झालेल्या सोनपेठ - गंगाखेड (नरवडी मार्ग) या रस्त्यावरील नवीन पूल व जुन्या पुलांची दुरुस्ती यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. या कामांचे मंगळवारी जिल्हा बॅंकेच्या संचालिका प्रेरणाताई वरपूडकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, विटा-लासिना-उक्कडगाव-शिर्शी या गोदाकाठच्या १७ कि.मी. रस्त्याचे काम आ. सुरेशराव वरपुडकर यांच्या प्रयत्नांतून अंदाजपत्रकासह मुख्यमंत्री सडक योजनेतून प्रस्तावित केले असून हे काम लवकरच सुरू होणार आहे. सोनपेठ तालुक्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे यावेळी वरपूडकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुंजाभाऊ धोंडगे, कार्यकारी अभियंता हरदास, उपअभियंता बडे, जनार्दन डुकरे, रावसाहेब मोकशे, जगन्नाथ कोलते, सुमित पवार, राजेभाऊ आंभोरे, राजू सौदागर, शुभम कदम आदींची उपस्थिती होती.