अनाथ मुलींसाठी विनामूल्य मंगल कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:08+5:302021-06-09T04:22:08+5:30
परभणी : कोरोनाने पालक गमावलेल्या मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालय विनामूल्य देण्याचा निर्णय येथील जिल्हा मंगल कार्यालय संघटनेने घेतला ...

अनाथ मुलींसाठी विनामूल्य मंगल कार्यालय
परभणी : कोरोनाने पालक गमावलेल्या मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालय विनामूल्य देण्याचा निर्णय येथील जिल्हा मंगल कार्यालय संघटनेने घेतला आहे.
मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या आपत्तीमुळे जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये व मंडप डेकोरेशन चालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. अशा या आपत्तीतही सामाजिक बांधिकली जपत मंगल कार्यालय संघटनेने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आवाहनास प्रतिसाद दिला. यावर्षी कोरोना आपत्तीने पालकत्व गमावलेल्या अनाथ मुलींच्या लग्न सोहळ्यांसाठी मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, मंडप डेकोरेशन असोसिएशननेही या निर्णयास समर्थन जाहीर करीत मंडप डेकोरेशनचे साहित्य विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला. संघटनेने घेतलेल्या निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना देण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद वाकोडकर, प्रभाकरराव देशमुख, शंकर आजेगावकर, मिलिंद डुब्बेवार, सखाराम दुधाटे, महेश सराफ, सय्यद गफार, गोविंद अग्रवाल, अविनाश कुलकर्णी, राजू चौधरी, गणेश सरदेशपांडे, डॉ. संजय टाकळकर, अभिजीत सराफ, जे. एस. शेख, प्रतीम चक्रवार, गौतम डहाळे, आनंद मकरंद, रघुनाथ आढाव, प्रशांत गुंड आदींची उपस्थिती होती.