व्हिएतनाम येथील २५० बुद्ध मूर्तींचे १७ रोजी मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:34+5:302021-09-02T04:38:34+5:30
तथागत गौतम बुद्धांनी मानवाला समता, करुणा, मैत्री, शांततेचा संदेश दिला. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांनी बौध्द धम्माचा प्रचार ...

व्हिएतनाम येथील २५० बुद्ध मूर्तींचे १७ रोजी मोफत वाटप
तथागत गौतम बुद्धांनी मानवाला समता, करुणा, मैत्री, शांततेचा संदेश दिला. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांनी बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जगात ८४ हजार बुद्ध विहारांची निर्मिती केली. धम्माचा प्रचार व प्रसार होण्यासाठी प्रसिध्द सिनेअभिनेता गगन मलिक यांनी ८४ हजार बुद्ध मूर्तिदान करण्याचा संकल्प केला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात बुद्धगया येथील महाबोधी विहार येथून करण्यात आली असून विविध ठिकाणी सुमारे आत्तापर्यंत ४ हजार मूर्ती दान करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर परभणी येथे १७ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात बौध्द अनुयायींना पंचधातूच्या २५० बुद्ध मूर्तीचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी सांगितले.