बाधितांच्या नातेवाइकांसाठी मोफत निवास, भोजन व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST2021-05-04T04:08:14+5:302021-05-04T04:08:14+5:30
परभणी : शहरातील विविध रुग्णालयांतील कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांसाठी विश्व हिंदू परिषद व सायन्स करिअर अकादमीच्या वतीने मोफत निवास व ...

बाधितांच्या नातेवाइकांसाठी मोफत निवास, भोजन व्यवस्था
परभणी : शहरातील विविध रुग्णालयांतील कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांसाठी विश्व हिंदू परिषद व सायन्स करिअर अकादमीच्या वतीने मोफत निवास व भोजनाची सुविधा करण्यात आली आहे.
वसमत रस्त्यावरील हॉटेल वाटिकाच्या मागे विश्व हिंदू परिषद व सरस्वती सायन्स करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ३ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि हभप अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले. यावेळी वेशासं बाळू गुरु असोलेकर, डॉ. रामेश्वर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दीपक मुगळीकर यांनी या कार्याचे कौतुक केले. प्रशासनाकडून या कामी सर्व सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास विहिपचे प्रांत मंत्री अनंत पांडे, प्रा. दीपक पांडे, जिल्हामंत्री सुनील रामपूरकर, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, बजरंग दलाचे प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे, गोपाळ रोडे, शहर अध्यक्ष राजकुमार भांबरे, कानडे, अभिजित कुलकर्णी, राऊत, खटिग, दिवाळकर, गजानन कुलकर्णी, यन्नावार तसेच मातृशक्तीच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.