फायनान्सच्या मॅनेजरवर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST2021-07-25T04:16:43+5:302021-07-25T04:16:43+5:30
मानवत येथे भारत फायनान्शियल इनक्लुजन लिमिटेड कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून गरजू व्यक्तींना सूक्ष्म कर्जपुरवठा करण्यात येतो. येथील शाखेत ...

फायनान्सच्या मॅनेजरवर फसवणुकीचा गुन्हा
मानवत येथे भारत फायनान्शियल इनक्लुजन लिमिटेड कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून गरजू व्यक्तींना सूक्ष्म कर्जपुरवठा करण्यात येतो. येथील शाखेत दत्तात्रय साधुराम बिरादार (२९, रा. लातूर) हे मॅनेजर पदावर कार्यरत होते. शाखेशी नवीन सदस्य जोडून त्यांना कर्जवाटप करणे व कर्ज दिलेल्यांकडून दर आठवड्याला कर्जाचा हप्ता वसूल करण्याची त्यांची जबाबदारी होती. मॅनेजर दत्तात्रय बिरादार यांनी ९ मार्च ते ७ जून या कालावधीत २३ कर्जदारांकडून १ लाख ६४ हजार ७९७ रुपयांची रक्कम वसूल केली; परंतु सदरील रक्कम त्यांनी फायनान्स कंपनीकडे जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. तसेच या रकमेचा अपहार केला. ही बाब लक्षात आल्यानंतर २३ जुलै रोजी याबाबत शाखा व्यवस्थापक भीमराव गोविंदराव सावळे यांनी मानवत पोलीस ठाण्यात आरोपीने फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याची फिर्याद दिली. त्यावरून आरोपी दत्तात्रय साधुराम बिरादार याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.