चार दिवसांआड नळांना पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आज उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST2021-06-03T04:14:03+5:302021-06-03T04:14:03+5:30
गोदावरी नदीपात्रासह मासोळी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनसुद्धा शहरातील नळांना १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने ...

चार दिवसांआड नळांना पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आज उपोषण
गोदावरी नदीपात्रासह मासोळी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनसुद्धा शहरातील नळांना १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी होत असलेली शहरवासीयांची धावपळ थांबविण्यासाठी नळांना चार दिवसांआड पाणी सोडण्यात यावे, या मागणीचे निवेदन १७ मे रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देऊनसुद्धा आजही दहा ते बारा दिवसाआड नळाला पाणी येत असल्याने शहरातील पाणीपुरवठा चार ते पाच दिवसाआड करावा, या मागणीसाठी ३ जून रोजी नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर शेख खालेद, अजमत खान मोहमद खान, निर्मला हजारे, हाजी शेख चांद यांच्या स्वाक्षरी आहेत.