शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी नदीला पूर; सलग तिसऱ्या दिवशी ८ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 15:18 IST

Rain in Parabhani : मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस झाला.

गंगाखेड ( परभणी ) : तालुका व परिसरात मंगळवार रोजीच्या रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आल्याने गंगाखेड ते परभणी महामार्गावरील नागठाणा पाटीवरून तालुक्यातील सुनेगाव, सायळा मार्गे मुळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुनेगाव जवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने सलग तिसऱ्या दिवशी हा मार्ग बंद झाला आहे. तसेच भांबरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर ही पाणी आल्याने एकूण ८ गावांचा संपर्क तुटला आहे.  ( For the third day in a row, 8 villages were cut off due to flooding Indrayani river ) 

मागील रविवारपासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या पाण्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आल्याने गंगाखेड-परभणी महामार्गावरील नागठाणा पाटी येथून सुनेगाव, सायळा मार्गे मुळी, नागठाणा, धारखेड तसेच परभणी तालुक्यातील धसाडी, अंगलगावकडे जाणाऱ्या मार्गावर सुनेगाव जवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने सोमवारपासून बंद असलेली वाहतूक बुधवारी देखील बंद पडली. सलग तिसऱ्या दिवशी हा मार्ग बंद झाला आहे. सुनेगाव, सायळा, मुळी, नागठाणा, धारखेड, धसाडी, अंगलगाव या सात गावांचा संपर्क पुन्हा तुटला आहे. तर महातपुरी फाटा ते भांबरवाडी दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या नाल्यावर चार ठिकाणी नव्याने उभारलेल्या पुलाची उंची कमी आहे. यामुळे चार पैकी दोन पुलावरून पाणी वाहत असल्याने भांबरवाडीकडे जाणारा रस्ता बंद पडला असून गावांचा संपर्क तुटला आहे. 

गंगाखेड तालुक्यातील खळी येथून खळी पुनर्वसनकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सोंडवरच्या नाल्यास पूर आल्याने हा मार्ग ही बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना दहा ते बारा किलोमीटरचा फेरा मारून खळी पुनर्वसन येथे जावे लागत आहे. त्याच प्रमाणे खळी शिवारातील सर्व्हे नंबर ३८७ मधील दादासाहेब पवार, बाबासाहेब पवार यांच्या शेतात तसेच सर्व्हे ३८८ व ४०२ मधील गणपती सुरवसे, भिमराव सुरवसे, गंगुबाई सुरवसे यांच्या शेतात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. येथे सुमारे ७ हेक्टर जमिनीवरील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी