शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी नदीला पूर; पुलावरून पाणी वाहत असल्याने ७ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 13:16 IST

Rain in Parabhani : इंद्रायणी नदीला पूर येताच सुनेगाव येथील पुलावर पाणी येऊन संपर्क

ठळक मुद्देसुनेगाव पुलाची उंची वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी

गंगाखेड: परभणी महामार्गावर असलेल्या नागठाणा पाटी येथून सुनेगाव मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर इंद्रायणी नदीच्या पुराचे पाणी पुलावर आल्याने रात्री १२ वाजेनंतर या मार्गावरील सात गावांचा संपर्क तुटला आहे. सोमवार रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत ही मार्ग खुला झाला नसल्याने पुलाच्या दोन्ही बाजूने नागरिकांची गर्दी जमा झाली होती. इंद्रायणी नदीला पूर येताच सुनेगाव येथील पुलावर पाणी येऊन संपर्क तुटत असल्याने या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी केली जात आहे.

रविवारी दुपारनंतर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. यामुळे गंगाखेड येथून परभणीकडे जाणाऱ्या महामार्गावरील नागठाणापाटी येथून सुनेगाव मार्गे सायळा, मुळी, नागठाणा, धसाडी, अंगलगाव, धारखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुनेगावाजवळ असलेल्या इंद्रायणी नदीच्या पुलाला असलेल्या नळकांड्यामध्ये पुराच्या पाण्याबरोबर आलेले फुर्सन अडकल्याने रविवार रोजीच्या रात्री सुनेगाव येथील इंद्रायणी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले. रात्री बारा वाजेपासून परभणी महामार्ग ते सुनेगाव मार्गे सायळा, धसाडी, आंगलगाव, मुळी, नागठाणा, धारखेड आदी गावांकडे जाणारा मार्ग बंद झाल्याने या गावांचा संपर्क तुटला होता. सोमवार रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत ही पुलावरील पाणी कमी न झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही दुचाकी चालक व नागरिक जीव धोक्यात घालून पुलावरील पाण्यातून मार्ग काढत होते. नुकतेच रस्त्याचे काम होऊन सुद्धा पुलाची उंची वाढविली गेली नसल्याने परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. पुलाची उंची लवकर वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी