शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

रबीतील पीकविमा योजनेत पाच पिकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:19 AM

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई, भूईमूग या पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे़ १७ नोव्हेंबरपासून ही योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी आपल्या पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई, भूईमूग या पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे़ १७ नोव्हेंबरपासून ही योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी आपल्या पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे़जिल्ह्यात यावर्षीच्या रबी हंगामात २० नोव्हेंबरपर्यंत दीड लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ पेरणी झालेल्या पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेची अंमलबजावणी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या मार्फत केली जाणार आहे़ रबी हंगामातील पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, कीड व रोगांमुळे पिकांच्या उत्पादनात घट आल्यास तसेच प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे, काढणीच्या वेळेस, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाला नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे़परभणी जिल्ह्यातील आधीसूचित महसूल मंडळातील शेतकºयांनी गहू, ज्वारी, हरभरा, करडई, भुईमूग या पिकांचा विमा हप्ता १ जानेवारी २०१८ पर्यंत भरून जास्तीत जास्त शेतकºयांनी पीक संरक्षित करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे़