दहा दिवसांमध्ये अवैध वाळू उपशाविरुद्ध पाच कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST2021-04-11T04:17:19+5:302021-04-11T04:17:19+5:30

४ एप्रिल रोजी मानवत येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अवैध वाळू उपशाप्रकरणी कारवाई करीत एक जेसीबी, दोन टिप्पर, ७ ...

Five actions against illegal sand subsidence in ten days | दहा दिवसांमध्ये अवैध वाळू उपशाविरुद्ध पाच कारवाया

दहा दिवसांमध्ये अवैध वाळू उपशाविरुद्ध पाच कारवाया

४ एप्रिल रोजी मानवत येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अवैध वाळू उपशाप्रकरणी कारवाई करीत एक जेसीबी, दोन टिप्पर, ७ ट्रॅक्टर, एक लोडर, असा २ कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला होता. ६ एप्रिल रोजी पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारात एक ट्रॅक्टर आणि एक ब्रास वाळू, असा ३ लाख ३ हजार याच शिवारात आणखी एका कारवाईत एक ट्रॅक्टर आणि एक ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली. गंगाखेड तालुक्यातील दुसलगाव शिवारात ६ एप्रिल रोजी वाळू उपसा करणाऱ्या दोन जेसीबी व अन्य एका वाहनासह २०० ब्रास वाळू, असा १ कोटी ५६ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला होता. गौंडगाव शिवारात ८ एप्रिल रोजी ६६ लाख ३७ हजार ५०० आणि धसाडी शिवारात ६ एप्रिल रोजी केलेल्या कारवाईत ७ ट्रॅक्टर आणि अडीच ब्रास वाळू, असा २८ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Five actions against illegal sand subsidence in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.