रागाच्या भरात पतीने पत्नीवर केले कात्रीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST2021-05-05T04:27:49+5:302021-05-05T04:27:49+5:30

साखला प्लॉट भागातील कैलास गवारे व अनिता गवारे या दाम्पत्यांमध्ये रविवारी रात्री क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यावेळी अनिता गवारे ...

In a fit of rage, the husband attacked his wife with scissors | रागाच्या भरात पतीने पत्नीवर केले कात्रीने वार

रागाच्या भरात पतीने पत्नीवर केले कात्रीने वार

साखला प्लॉट भागातील कैलास गवारे व अनिता गवारे या दाम्पत्यांमध्ये रविवारी रात्री क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यावेळी अनिता गवारे या जाब विचारत असल्याच्या कारणावरून रागाच्या भरात कैलास गवारे याने घरातील दोरीने त्यांना गळफास लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनिता या सुटका करून घेत पळत असता कैलास गवारे याने घरातील शिलाई मशीनवरील कात्री उचलून पत्नी अनिता यांच्या पोटावर, छातीवर, मांडीवर सपासप वार केले. यावेळी अनिता यांनी आरडा ओरडा केला. त्यानंतर आजूबाजूचे नागरिक जमले. त्यांनी जखमी अनिता गवारे यांना तातडीने दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. याबाबत अनिता गवारे यांनी सोमवारी पती कैलास गवारे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी कैलास गवारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: In a fit of rage, the husband attacked his wife with scissors