परभणीत गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:03 AM2018-04-23T01:03:57+5:302018-04-23T01:03:57+5:30

शहरातील पाथरीरोडवरील एका गोदामाला आग लागून कापसाच्या गाठीचे नुकसान झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.

Fire in the Parbhani godown; Loss of millions | परभणीत गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

परभणीत गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील पाथरीरोडवरील एका गोदामाला आग लागून कापसाच्या गाठीचे नुकसान झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.
पाथरीरोडवर हरिष कत्रुवार यांचे गोदाम आहे. रविवारी दुपारच्या सुमारास गोदामाला आग लागल्याची माहिती समजताच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. परभणी येथील अग्नीशमन दलाने आग विझविण्याचे काम सुरु केले. मात्र गोदामात मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी असल्याने आग वाढतच गेली. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग आटोक्यात येत नसल्याने पाथरी व मानवत येथील अग्नीशमन दलाला बोलविण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरु होते. या आगीत कापूस, सरकी, पेंड जळून खाक झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Fire in the Parbhani godown; Loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.