शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

अवैध वाळू वाहतुकीसाठी रस्ता देणाऱ्या शेतकऱ्यांसह उपसा करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 7:14 PM

जागा देणारे दोघे शेतकरी फरार आहेत

ठळक मुद्देयंत्र चालक व मालक अटकेत

गंगाखेड : वझूर येथील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा प्रकरणी शेतमालक आणि यंत्रचालक अशा चारजणांविरोधात मंगळवारी ( दि. २८ ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना बुधवारी पोलीसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोघे फरार आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वझुर ( ता. पूर्णा ) येथील गोदावरी नदी पात्रातून यंत्राद्वारे अवैधरित्या वाळु उपसा केल्या जात असल्याची गोपनीय माहिती महसूल पथकाला मिळाली. यावरून सोमवारी ( दि. २७ ) सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील व पूर्णा तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या पथकाने येथे धाड टाकली. यावेळी पथकाने पाच लाख रुपये किंमतीचे वाळू उपसा करणारे यंत्र जप्त केले होते. 

याप्रकरणी मंगळवारी ( दि. २८ ) रात्री उशीराने वझुर सज्जाचे तलाठी मारोती जालने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळु उपसा व वाहतूक करण्यासाठी शेतातील जागा व रस्ता उपलब्ध करून देणारा शेतकरी गजानन बालासाहेब डिगोळे आणि यंत्र मालक व चालक यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस निरीक्षक वाय.एन. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत जमादार हरिभाऊ शिंदे, पो.ना. रामकीशन कोंडरे यांनी बुधवारी ( दि. २९ ) विठ्ठल लक्ष्मण अडागळे ( ३४,रा. टाकरवण ता. माजलगाव जि. बीड ) व अमोल भगवान लोंढे ( २१, रा. घनसावंगी जि. जालना ) या दोघांना ताब्यात घेतले. तर शेतमालक गजानन डिगोळे व बबलू पवार दोघे ( रा. वझुर ता. पूर्णा ) हे मात्र फरार झाले आहेत.

टॅग्स :sandवाळूFarmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभाग