रेल्वे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST2021-02-14T04:16:24+5:302021-02-14T04:16:24+5:30
जिल्ह्यात वाढली भाजीपाल्याची आवक परभणी : जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. यावर्षी प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने सिंचनाचा प्रश्न ...

रेल्वे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड
जिल्ह्यात वाढली भाजीपाल्याची आवक
परभणी : जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. यावर्षी प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकांबरोबरच भाजीपाल्यावर भर दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने भाज्यांचे दर घसरले आहेत.
खड्ड्यांमुळे वाढले अपघाताचे प्रमाण
परभणी : मानवत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परभणी ते मानवत या २५ किमीच्या अंतरात अनेक खड्डे झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत या रस्त्याचे काम रखडले असल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
निधीअभावी रखडली रस्त्यांची कामे
परभणी : शहरातील विकासकामांसाठी अजूनही शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे प्रस्तावित कामे रखडली आहेत. मागील वर्षी शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. मात्र त्यासाठी निधी मिळाला नाही. त्यातच कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने ही कामे ठप्प पडली होती. विकासकामांसाठी निधी द्यावा, यासाठी पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कर वसुलीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद
परभणी : शहरात मनपाने वसुली अभियान सुरू केले आहे. मात्र नागरिकांकडून त्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही. शहरातील नागरिकांकडे कोट्यवधी रुपयांचा कर थकला असल्याने मनपासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. वसुली ठप्प असल्याने त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवरही होत आहे. मनपा प्रशासनाने कर न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला असला तरी अद्यापही वसुलीचा वेग वाढलेला नाही.
उद्यानातील खेळण्या दुरुस्तीची मागणी
परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानातील दुरवस्था झाली आहे. मागील एक महिन्यापासून उद्याने खुली करण्यात आली असून, बच्चे कंपनी सायंकाळच्या वेळी उद्यानात दाखल होत आहेत. तुटलेल्या खेळण्यांमुळे मुलांना इजा पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा उद्यानातील खेळण्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.