दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST2021-05-12T04:17:35+5:302021-05-12T04:17:35+5:30
वसमत तालुक्यातील कौडगाव येथील सिद्धार्थ भगवान चव्हाण व त्यांचे मेहुणे गंगाधर भीमराव राऊत हे १ मे रोजी नातेवाइकांना भेटून ...

दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
वसमत तालुक्यातील कौडगाव येथील सिद्धार्थ भगवान चव्हाण व त्यांचे मेहुणे गंगाधर भीमराव राऊत हे १ मे रोजी नातेवाइकांना भेटून एमएच ३८ एस ६२७९ क्रमांकाच्या दुचाकीवरून येलदरी येथून जिंतूरमार्गे गावाकडे जात असताना दुपारी ४ च्या सुमारास जिंतूर शहरापासून १ किलोमीटर अंतरावरील औंढा टी पॉईंट येथे एमएच २२ एव्ही १६३४ या क्रमांकाच्या दुचाकीचालकाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकी चालविणारे गंगाधर राऊत गंभीर जखमी झाले. उपचारार्थ त्यांना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर परभणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथून त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले. नांदेड येथे उपचार सुरू असताना ५ मे रोजी सकाळी ९ वाजता गंगाधर राऊत यांचा मत्यू झाला. याबाबत सिद्धार्थ चव्हाण यांनी ९ मे रोजी फिर्याद दिली. त्यावरून २२ एव्ही १६३४ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.