४० दिवसानंतर बस चालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:21 IST2021-04-30T04:21:54+5:302021-04-30T04:21:54+5:30

वालूर येथील राधाबाई बाबासाहेब वाटुरे या १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पुतण्या दीपक रावसाहेब वाटुरे याच्यासोबत एमएच २२ ...

Filed a case against the bus driver after 40 days | ४० दिवसानंतर बस चालकावर गुन्हा दाखल

४० दिवसानंतर बस चालकावर गुन्हा दाखल

वालूर येथील राधाबाई बाबासाहेब वाटुरे या १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पुतण्या दीपक रावसाहेब वाटुरे याच्यासोबत एमएच २२ के ६५७ क्रमांकाच्या दुचाकीवरून सेलू येथून वालूर येथे जात होत्या. यावेळी ब्राम्हणगाव शिवारात समोरून येणाऱ्या एमएच ०७ सी ७४३४ क्रमांकाच्या एसटी महामंडळाच्या बसच्या चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे एसटी बस चालवून त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यानंतर बस चालक वाहन न थांबवता निघून गेला. या अपघातात राधाबाई वाटुरे व दीपक वाटुरे हे दोघे जखमी झाले. त्यानंतर गावातील अन्य व्यक्तींनी त्यांना उपचारासाठी सेलू येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. उपचारानंतर २८ एप्रिल रोजी सेलू पोलीस ठाण्यात राधाबाई वाटुरे यांनी फिर्याद दिली. त्यावरून एमएच ०७ सी ७४३४ क्रमांकाच्या एसटी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Filed a case against the bus driver after 40 days