गवळी गल्लीत दोन गटात हाणामारी परस्परविरोधी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:00+5:302021-05-30T04:16:00+5:30
संतोष उदावंत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री ते घरासमोर बसले असताना निहाल खान, अब्दुल रहेमान, खीजर ...

गवळी गल्लीत दोन गटात हाणामारी परस्परविरोधी गुन्हे दाखल
संतोष उदावंत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री ते घरासमोर बसले असताना निहाल खान, अब्दुल रहेमान, खीजर खान, मुदस्सीर, आसिफ यांनी समोर येऊन शिट्ट्या मारत घुरून पाहिले. यासंदर्भात विचारणा केली असता, आरोपींनी साथीदारांच्या मदतीने मारहाण केली.
याच प्रकरणात खाजा खान अहमद खान पठाण यांनीही तक्रार दिली आहे. घरी असताना त्यांना भांडणाचा आवाज आला. त्यामुळे घराबाहेर जाऊन पाहणी केल्यावर विक्रम, संतोष, वैभव, सुमीत, शुभम हे शेख रफिक यांना मारहाण करीत असल्याचे दिसले. भांडण सोडवण्यासाठी गेलो तेव्हा मुलगा निहाल अहमद याला संतोष, विक्रम हे येता-जाता घुरून का पाहतात, यावरून भांडण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही तक्रारीवरून दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक मंगेश नाईक तपास करीत आहेत.
सात आरोपींना अटक
या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. इतर सात आरोपी फरार आहेत. घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या घटनास्थळावर क्यूआरटी पथकाचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.