शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

विद्यार्थ्यांची पावणेसहा कोटींची शिष्यवृत्ती शासनाकडे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:05 IST

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या खाजगी कृषी महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची सुमारे पावणेसहा कोटी रुपयांची रक्कम पाच वर्षांपासून शासनाकडे थकली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र आर्थिक समस्यांना तोंड देत शिक्षण पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देविभागातील कृषी महाविद्यालये : शासनाकडून मिळेना निधी

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या खाजगी कृषी महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची सुमारे पावणेसहा कोटी रुपयांची रक्कम पाच वर्षांपासून शासनाकडे थकली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र आर्थिक समस्यांना तोंड देत शिक्षण पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने शासनाच्या वतीने शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक शुल्क महाविद्यालयांमार्फत अदा केले जाते. एका चांगल्या हेतुने ही योजना राबविली जात आहे; परंतु, त्यासाठी वेळेत निधी दिला जात नाही. मागणी केलेल्या निधीच्या तुलनेत निम्माच निधी उपलब्ध करुन दिला जात असल्याची आजपर्यंतची स्थिती आहे. २०११-१२ पासून विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रतिपूर्ती शुल्क शासनाकडे थकल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय महाविद्यालय प्रशासनालाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.उपलब्ध झालेल्या माहितीनुसार खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयांना शिक्षण संचालक तथा कृषी अधिष्ठाता यांच्या कार्यालयातून दिल्या जाणाºया रक्कमेपैकी सुमारे ४ कोटी ८६ लाख ६४ हजार ३८५ रुपये शासनाकडे थकले आहेत. तर सहयोगी अधिष्ठाता शिक्षण यांच्या कार्यालयातून खाजगी विना अनुदानित कृषीतंत्र विद्यालयांना दिल्या जाणा-या रक्कमेपैकी ८७ लाख ६७ हजार ५७५ रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत. ही रक्कम प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी मिळणे अपेक्षित आहे. मात्र पाच वर्षांपासून रक्कम थकली आहे.---१२ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीखाजगी विना अनुदानित कृषी महाविद्यालयांमध्ये ५ वर्षात १२ हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांची शिक्षण प्रतिपूर्तीची ही रक्कम थकली आहे. त्यात विना अनुदानित महाविद्यालयांमधील ९ हजार ५६ आणि कृषी तंत्र विद्यालयांमधील ३ हजार ९२६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.---वर्षनिहाय प्रलंबित रक्कमकृषी महाविद्यालये२०११-१२ : ९८, १४, १००२०१२-१३ : १, ४७, २५,५६५२०१३-१४ : ५५, १६,४७३२०१४-१५ : ००००२०१५-१६ : १,८६, ०८,२४७एकूण ४, ८६, ६४,३८३

कृषी तंत्र विद्यालये२०११-१२ : २२,८२,१३६२०१२-१३ : ३४,७०,५००२०१३-१४ : १०, ८३,२१६२०१४-१५: ००००२०१५-१६ : १९, ३१,७२३एकूण ८७, ६७,५७५

टॅग्स :parabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय