कोरोनाने जिल्ह्यात पंधरा रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST2021-05-16T04:16:44+5:302021-05-16T04:16:44+5:30
कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे जिल्हावासीयांत धास्ती कायम आहे. दररोज १० ते १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. शनिवारी जिल्हा रुग्णालयातील ...

कोरोनाने जिल्ह्यात पंधरा रुग्णांचा मृत्यू
कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे जिल्हावासीयांत धास्ती कायम आहे. दररोज १० ते १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. शनिवारी जिल्हा रुग्णालयातील ५, आयटीआय हॉस्पिटलमधील ४, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ३ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ३ अशा १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ८ पुरुष आणि ७ महिलांचा समावेश आहे.
दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. मागील ८ दिवसांच्या तुलनेत शनिवारी रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाली. आरोग्य विभागाला २ हजार ११३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ७२८ अहवालांमधून ४४८ आणि रॅपिड टेस्टच्या ३८५ अहवालांमध्ये ११५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ९१५ झाली असून त्यापैकी ४१ हजार २२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार ११७ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ३ हजार ५७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
शनिवारी ८४५ कोरोनामुक्त
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर जिल्ह्यात वाढला आहे. ही बाब समाधान देणारी असून, मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. शनिवारी ५६३ नवीन रुग्ण नोंद झाले तर ८४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.