शेतातही होतो राष्ट्रभक्तीचा जागर

By Admin | Updated: January 27, 2015 12:26 IST2015-01-27T12:26:15+5:302015-01-27T12:26:15+5:30

राष्ट्रभक्तीचा जागर करणारे राष्ट्रीय सणही तेवढय़ाच उत्साहाने साजरे करण्याचा उपक्रम तालुक्यातील एका महिला शेतकर्‍याने सात वर्षांपासून अखंडिपणे सुरू केला आहे.

In the field, there was a rage of patriotism | शेतातही होतो राष्ट्रभक्तीचा जागर

शेतातही होतो राष्ट्रभक्तीचा जागर

परभणी : रितीरिवाजाने घालून दिलेले पारंपरिक सण खेडोपाडी उत्साहात साजरे होतात. त्याच जोडीला राष्ट्रभक्तीचा जागर करणारे राष्ट्रीय सणही तेवढय़ाच उत्साहाने साजरे करण्याचा उपक्रम तालुक्यातील एका महिला शेतकर्‍याने सात वर्षांपासून अखंडिपणे सुरू केला आहे. कुठलाही गाजावाजा न करता राष्ट्रभक्तीची ही उपासना इतरांसाठी निश्‍चितच आदर्शवत आहे. 
कुठलेही शिक्षण घेतले नसताना साक्षर बनलेल्या झाडगाव येथील सुशीलाबाईज्ञानोबाराव देशमुख या सात वर्षांपासून आपल्या शेतात राष्ट्रीय सणांच्या दिवसी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करतात. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी हा नेम आजपर्यंत चुकलेला नाही. विशेष म्हणजे, राष्ट्रभक्तीचे वातावरण या दिवशी तयार केले जाते. रांगोळी काढून शेतातील ध्वजस्तंभ सजविला जातो. शेजारील शेतकर्‍यांना बोलावून राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा हा उपक्रम राबविला जातो. आज प्रजासत्ताक दिन असून, या दिवशीही झाडगाव येथील शेतात हा उपक्रम राबविल्या जाणार आहे. सुशीलाबाई देशमुख यांची ही राष्ट्रभक्ती इतर महिला, ग्रामीण शेतकर्‍यांसाठी आदर्शठरणारी आहे.

 ■ सुशीलाबाई देशमुख यांचा मुलगा सुशील देशमुख हे क्रीडा शिक्षक असून, शाळेतील ध्वजारोहणाची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळे राष्ट्रीय सणांच्या आधी चार-पाच दिवस घरी ध्वजारोहणाच्यानिमित्ताने वातावरण निर्मिती होते. ध्वज, ध्वजस्तंभ या बरोबरच इतर साहित्य घरी असते. यातूनच सुशिलाबाईंना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी स्वत:च्या शेतामध्ये ध्वजारोहणास सुरुवात केली.

■ शासकीय नियमानुसार शासकीय, निमशासकीय संस्थांबरोबरच प्रत्येकाला आपल्या घरी, खाजगी कार्यालयात ध्वजारोहण करता येते. परंतु, असे ध्वजारोहण करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. सुशीलाबाईंनी हा पायंडा पाडला आहे. 

Web Title: In the field, there was a rage of patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.