मुलाच्या मृत्यूच्या नैराश्येतून पित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:27 AM2020-12-05T04:27:48+5:302020-12-05T04:27:48+5:30

जिंतूर तालुक्यातील येसेगाव येथील संजय तुकाराम घोळवे (४२) यांचा मुलगा रामप्रसादचा दोन महिन्यांपूर्वी त्याच्या मामाच्या गावी पांगरी येथे शेतातील ...

Father commits suicide due to depression of son's death | मुलाच्या मृत्यूच्या नैराश्येतून पित्याची आत्महत्या

मुलाच्या मृत्यूच्या नैराश्येतून पित्याची आत्महत्या

Next

जिंतूर तालुक्यातील येसेगाव येथील संजय तुकाराम घोळवे (४२) यांचा मुलगा रामप्रसादचा दोन महिन्यांपूर्वी त्याच्या मामाच्या गावी पांगरी येथे शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे संजय घोळवे नैराश्यात होते. त्यांनी ३ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास येसेगाव शिवारातील एका शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळेनंतर ही बाब उघडकीस आली. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी जिंतूर पोलिसांना दिली. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास बीट जमादार धनंजय गायकवाड करीत आहेत. संजय घोळवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Father commits suicide due to depression of son's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.