मुलाच्या मृत्यूच्या नैराश्येतून पित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST2020-12-05T04:27:46+5:302020-12-05T04:27:46+5:30

जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील संजय तुकाराम घोळवे (४२) यांच्या मुलाचा दोन महिन्यांपूर्वी त्याच्या मामाच्या पांगरी या गावी शेतातील विहिरीत ...

Father commits suicide due to depression of son's death | मुलाच्या मृत्यूच्या नैराश्येतून पित्याची आत्महत्या

मुलाच्या मृत्यूच्या नैराश्येतून पित्याची आत्महत्या

जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील संजय तुकाराम घोळवे (४२) यांच्या मुलाचा दोन महिन्यांपूर्वी त्याच्या मामाच्या पांगरी या गावी शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे संजय घोळवे हे नैराश्येत होते. मुलाच्या मृत्यूचे दु:ख त्यांच्या मनात होते. यातूनच नैराश्य आल्याने त्यांनी ३ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास येसेगाव शिवारातील एका शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर ही बाब उघडकीस आली. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी जिंतूर पोलिसांना दिली. त्यानंतर बीट जमादार धनंजय गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास बीट जमादार धनंजय गायकवाड करीत आहेत. मयत संजय घोळवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Father commits suicide due to depression of son's death